जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथे गुरुवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने चार बालकांसह सहा जण जखमी झाल्याचा प्रकार घडला. त्यापैकी पाच जणांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.

रात्री ७.३० वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने जिशान जुम्मा तडवी (वय २ वर्ष), सायमा रमजान तडवी (वय दीड वर्ष), खुशी सायबू तडवी (वय ८), सोनी हमीद तडवी (वय ३) ही चार बालके व मजीद मेहबूब तडवी (वय २०) व शेख शकील (वय २६) अशा एकूण सहा जणांना चावा घेतला. पाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले.












