जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे १३ हजार मुस्लिम बांधवांनी बुधवारी सकाळी खडका रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले.खडका रोडवरील ईदगाह मैदानावर माैलाना रेहान शेख यांनी, तर जामनेर रोडवरील जुन्या ईदगाह मैदानावर माैलाना सुखियान रजा यांनी नमाज पठण केले. यानंतर मुस्लिम बांधवांना डीवायएसपी सोमनाथ वाघचाैरे, पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गाेठला, हरिश भाेई आदींनी शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. तरीही मुस्लिम बांधवांनी नमाजसाठी ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे या मैदानावर शुकशुकाट होता. यंदा मात्र ईदचा सण हर्षोल्हासात साजरा झाला. शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानावर मंगळवारी सकाळी मुस्लिम बांधवांची प्रचंड गर्दी उसळली हाेती. सकाळी ८.३० वाजता सामूहिक नमाज पठण सुरू झाले. नऊ वाजेपर्यंत नमाज चालली. दरम्यान, दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर बंधने होती. यंदा हे निर्बंध शिथिल असले तरी शासन व प्रशासनाच्या सूचना पाळूनच सामूहिक नमाज अदा करण्यात आली.