जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । शहरात व्यावसायिकांनी रात्री १० वाजता दुकाने बंद करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहे. या वेळेनंतर जी दुकाने सुरू असलेली मिळून येतील त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू. नियम मोडणारा कुणीही असला तरी तरी कारवाई होईल, असा इशारा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.
भुसावळ शहरातील सर्व व्यावसायिकांनी रात्री १० वाजेपर्यंत दुकाने बंद करावी असं सांगून देखील अनेक जण पोलिसांना जुमानत नाही. रात्री दहानंतर देखील उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवतात. कुणी पोलिसांना चकवा देण्यासाठी अर्धे शटर उघडे ठेवतो, तर कुणी शटर खाली करून दुकाने सुरू ठेवतात. नाहाटा चाैफुली ते रेल्वे स्टेशन परिसर, डाॅ. आंबेडकर चाैक, रजा टाॅवर, खडका राेड, अमरदीप टाॅकीज परिसर, सिंधी काॅलनी, जळगाव राेड या मार्गावर असे प्रकार वारंवार होत आहे. नियम न पाळणाऱ्या या व्यावसायिकांची यादी तयार करावी. वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर हातगाड्या लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
- महापालिका पाईप चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Amalner : घरफोड्या करून पैसे जमविले, कार खरेदी करण्यासाठी गेला अन् तिथेच अडकला
- दुचाकी वाहनांकरिता नविन नोंदणी क्रमांकाच्या मालिकेस 09 डिसेंबर पासून सुरुवात
- महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर ; वाचा कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
- गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट सांभाळणार शिवसेनेचा मोर्चा; हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत चर्चा