⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

श्रीराम वहनोत्सव : आज श्री सरस्वती मातेचे वहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । श्रीराम वहनोत्सवात मंगळवारी श्री सरस्वती मातेचे वहन आहे. माता सरस्वती ही मोरावर बसून हातात वीणा, पुस्तक, संगीत व शुभ्र वस्त्र परिधान करत सर्वांना ज्ञानमार्गाने जात चारित्र्य निष्कलंक ठेवून ज्ञानसंपन्न होण्याचे सुचवते. ज्ञानासारखे पवित्र या भूमीवर दुसरे काही नाही. आपल्या दु:खाचे कारण म्हणजे अज्ञान होय. माता शारदेची पूजा केल्याने या दु:खापासून आपले संरक्षण होते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे, असा संदेश देत प्रभू श्रीराम हे मोराच्या वाहनातून सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर संस्थानातून येत आहे.

असा आहे वहन दिंडी मार्ग
सायंकाळी ७ वाजता गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीराम मंदिर संस्थानात वहन पूजनासह आरती होईल. त्यानंतर वहन श्रीराम मंदिरातून निघून भोईटे गढी, कोल्हेवाडा, आंबेडकरनगर मार्गे येत गोपाळपुऱ्यातील गोविंदा चौधरी यांच्याकडे वहन आरती आणि पानसुपारीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर का. उ. कोल्हे विद्यालयमार्गे येत कालिंका माता मंदिर येथे आरती होईल. तेथून अयोध्यानगर येथे हनुमान मंदिराजवळ चारुदत्त चौधरी यांच्याकडे वहन आरती व पानसुपारीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर का. उ. कोल्हे विद्यालय, तरुण कुढापा चौक मार्गे वहन रथचौक मंदिरात येईल. या ठिकाणी आरती होऊन मंगेश महाराज यांच्या हस्ते भक्तांना श्रीफळ देण्यात येईल.