⁠ 
[rank_math_breadcrumb]

मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने चाळीसगाव हादरले; संशियत CCTV कॅमेऱ्यात कैद..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव शहरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून गोळीबार करून संशयित आरोपी हे फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. दरम्यान याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील पोतदार हायस्कूल जवळील सारंग अशोक बेलदार (वय ४९) यांच्या घरासमोर तीन दुचाकींवर सहा जण आले आणि यातील बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकान हवेत गोळीबार करून सारंग बेलदार याच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केलं. तसेच शिवीगाळ करत दुचाकीवरून पसार झाले. हा गोळीबार जुन्या वादातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. गोळीबार करून संशयित आरोपी हे फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे पोलीसांनी संशयित आलेल्या संकेत उर्फ बाळू मोरे रा. हनुमान वाडी चाळीसगाव याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरातून ६ जिवंत काडतूस, पिस्टल मॅगझीन, कोयता, गुप्ती, स्टील रॉड आणि बेसबॉल खेळण्याची लाकडी बॅट असा घातक हत्यारे मिळून आले आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.