धक्कादायक : तरुणाला कानशिलात लगावली अन…

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । खाजगी वाहनातून प्रवास करत असताना तरुणाचा ८हजार रुपये किमतीचा मोबाईल सोबतीच्या भामट्यांची लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 12T162526.461 jpg webp

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे अमोल उखर्डू पाटील हा तरुण राहतो. तो मार्केटिंग करतो. अमोल हा 10 जून रोजी पिंपळकोटा येथून जळगावला येण्यासाठी एका खासगी वाहनात बसला. वाहनात अगोदरच तीन अनोळखी व्यक्ती बसलेले होते. जळगाव शहरातील मानराज पार्क जवळ अमोल हा वाहनातून उतरला. यावेळी वाहनातील अनोळखी पैकी एकाने शिवीगाळ करत अमोल च्या कानशिलात लगावली. त्यानंतर तो पुन्हा वाहनात जाऊन बसला. वाहनातून उतरलेल्या अमोलने त्याच्या खिशात हात घातला असता खिशात ठेवलेला मोबाईल आढळून आला नाही. वाहनातील तीन अनोळखी व्यक्तींनी मोबाईल चोरून नेल्याची खात्री झाल्यावर अमोल पाटील याने शनिवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील हे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now