धक्कदायक : तरुणीचा सहा महिन्यांपासून विनयभंग!

सप्टेंबर 8, 2022 11:48 AM

bhusawal news-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील 18 वर्षीय युवतीचा ती अल्पवयीन असताना व सुमारे सहा महिन्यांपासून विनयभंग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

crime 2022 06 03T115923.372 jpg webp

सचिन ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील (कुर्‍हेपानाचे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पाटील याने तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील 18 वर्षीय युवतीचा ती अल्पवयीन असताना व सुमारे सहा महिन्यांपासून ते 4 सप्टेंबर रोजी रात्री पावणे दोन वाजेदरम्यान तरुणीला मिठी मारत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडीत तरुणीने तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने आरोपीविरोधात गुनहा दाखल करण्यात आला. 18 वर्षीय युवतीच्या तक्रारीनुसार सहा महिन्यांपूर्वी तसेच पिडीता अल्पवयीन असताना विनयभंग केला होता शिवाय 4 रोजी रात्री पावणेदोन वाजता तरुणीवर प्रेम असल्याचे सांगत तिचा विनयभंग करीत तिला मिठी मारली तसेच माझ्याशी लग्न कर अन्यथा मोबाईलमध्ये काढलेला फोटो व्हायरल करेल, तुझ्या आई-वडिलांना 70 हजार रुपये दिल्याची बदनामी करेल, अशी धमकीही दिली. याबाबत पीडीतेने तक्रार दिल्याने आरोपीला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now