धक्कादायक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कामगाराने कंपनीच जाळली, लाखोंचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता मालकाने पैसे न दिल्याने कामगाराने चक्क कंपनीस जाळल्याची घटना काल दि. २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. यात सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले असून घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत कंपनीच्या मालकाने बोडवड पोलिसांत तक्रार दिली, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

कंपनीचे मालक देवराम कडू माळी (वय ५२ रा.बोदवड ) यांनी पोलिसात तक्रार दिली. काल दि.२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगार आरोपी (पवन ईशवर माळी रा. बोदवड) याने मालक देवराम कडू माळी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता मालकाने पैसे न दिल्याचा राग आल्याने चक्क कंपनीस जाळली. यात मिरची, धने, हळद, खडा, गरम मसाला, पावडर ताईच सुखी मिरची तर २४ टॅन फॅक्ट्रीतील मशनरी, इलेक्ट्रिक वायरी, सीसीटीव्ही कॅमेरे, दोन पत्राचे शटर, वजनाचे काटे असा मुद्देमाल जळाला असून यामध्ये सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणी कंपनीचे मालक देवराम कडू माळी यांनी दि. २३ रोजी पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी भेट दिली. त्यानुसार भा,कलम ४,३६ प्रमाणे आरोपी पवन ईशवर माळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सुधाकर शेजोडे करत आहे.