धक्कादायक : तलवारीचा धाक दाखवून महिलेला धमकी देत विनयभंग!

ऑगस्ट 25, 2022 2:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । भुसावळ शहरात एका महिलेला तलवारीचा धाक दाखवून धमकावण्यासह विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

राहूल पाटील व विष्णू पथरोड (रा. वाल्मीक नगर, ३२ खोली, भुसावळ) असे दोघांचे नाव आहे. या दोघांनी मंगळवारी रात्री एका महिलेच्या घरावर हल्ला करून त्यांना तलवारीचा धाक दाखवून धमकावले. तसेच त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण करून धमकावण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी सदर महिलेने पोलीस स्थानकात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार राहूल पाटील व विष्णू पथरोड या दोघांवर आर्म ऍक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now