⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

धक्कादायक : पद्मालय येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचे वाहन पलटले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील नातेसंबंध असलेले आठ जण श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे गणपती दर्शनाला गेले असता दर्शन करून घरी परताना एरंडोल पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर निखिल पेट्रोल पंपाजवळ त्यांची ओमिनी गाडी पलटी झाली. त्यात सर्वजण जखमी झाले पैकी गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल म्हसावद रस्त्यावर घडली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही नोंद न होती.

मंजू बारकू मोरे वय ९, रा. सोनबर्डी, चैत्राम आनंदा सोनवणे वय 38, सोनबर्डी, रवींद्र सुकलाल भिल वय 50 रा. साकेगाव, पुनम भाऊसाहेब भिल वय19, रा. सोनबर्डी, भाऊसाहेब आनंदा सोनवणे वय ३०, राहुल हिरामण भिल वय २० रा. एरंडोल, सोनाली रवींद्र भिल वय १५ रा.सोनबर्डी, वामन मारुती कुराडे वय 35 रा.सोनवाडी असे जखमींचे नाव आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील व डॉ. संदीप गांगुर्डे यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. त्यानंतर गंभीर जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार अर्थ दाखल करण्यात आले.