जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव शहरातील दत्तवाडी भागात दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी किराणा दुकानदार महिलेला, कपाटात काय वस्तू आहे ते दाखवा असे सांगितल्यानंतर महिलेने मान मागे फिरवली. त्याचवेळी भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोतहिसकावून पळ काढला, ही घटना १४ रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास घडली.

कमलाबाई शंंकरलाल खत्ती (वय ७०) यांचे दत्तवाडी येथे किराणा दुकान आहे. त्या दुकानात असताना रंगाने गोरा, चेहरा गोल व चपटा, मध्यम बांधा असलेला, डोक्यावर लांब केस असलेला अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा काळे कपडे घातलेला तरुण व अन्य एक इसम, असे दोघे काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने दुकानाजवळ आले. त्यातील एकाने दुकानातील कपाटाकडे हात दाखवून ते काय आहे मला दाखवा असे सांगितले. त्यावेळी कमलाबाई यांनी मागे वळून पाहण्यासाठी मान फिरवताच, भामट्याने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावली. त्यानंतर दुचाकीवरून दोघे भामटे पसार झाले. या प्रकाराने घाबरलेल्या कमलाबाई खत्ती यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






