धक्कदायक : विवाहितेने मुलगी घरी असतानाच उचलले टोकाचे पाऊल

सप्टेंबर 14, 2022 4:42 PM

Bodavad news-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । बोदवड तालुक्यातील भानखेडा येथे २४ र्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, 13 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon 4 jpg webp

भारती योगेश उगले (24, भानखेडा, ता.बोदवड) असे मयताचे नाव आहे. भारती उगले या विवाहितेच्या पतीचा वर्षभरापूर्वी मुक्ताईनगर येथे अपघाती मृत्यू झाल्यानंतर विवाहिता माहेरी भानखेडा येथे चार वर्षीय मुलीसह आली होती. मंगळवारी दुपारी विवाहिता व तिची मुलगी घरी असताना विवाहितेने लोखंडी पाईपाला ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी नरेंद्र जगन्नाथ देशमुख (49) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सचिन चौधरी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now