धक्कादायक : मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर अत्याचार

ऑक्टोबर 6, 2022 7:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । जळगावातील 29 वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 30T160214.720 jpg webp

राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. 29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती कामानिमित्त जळगावातील एका भागात पतीसह राहते. विवाहितेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पीडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेशकुमार याने पीडीतेला बिहारमधील गावाकडे बोलावत तिच्यावर 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान बलात्कार केला तसेच घटनेची वाच्यता कुणाकडे न करण्याबाबत धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now