गुन्हेजळगाव जिल्हा

धकादायक : रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच लांबवली जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२  महामार्गावर दुचाकी-चारचाकीमध्ये धडक झाल्यानंतर जखमीला रुग्णवाहिकेत हलवत असतानाच रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन लांबवली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली.

राजीव मोतीराम सुरवाडे (44, सात नंबर पोलिस चौकीमागे, नालंदा नगर भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी स्वीप्ट (एम.एच.19 बी.यु.1766) वरील अनोळखी चालकाविरोधात अपघात केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान मार्बलसमोर दुचाकी-चारचाकीत अपघात झाल्याने त्यातील जखमीला उपचारार्थ हलवण्यासाठी रुग्णवाहिका मागवण्यात आली मात्र तक्रारदार अमित सतीशकुमार देसाई (33, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या भावाच्या गळ्यातील 33 ग्रॅम वजनाची व एक लाख 68 हजार 817 रुपये किंम1तीची सोन्याची चेन खाली पडल्यानंतर ती रुग्णवाहिकेतील पॅरामेडिकल स्टाफ राजीव मोतीराम सुरवाडे (44, सात नंबर पोलिस चौकीमागे, नालंदा नगर भुसावळ) यांनी खिश्यात टाकली.

जखमी रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना चेन गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर चौकशीअंती सुरवाडे यांनी चैन लांबवल्याचे उघड झाल्यानंतर बुधवारी सकाळी 6.11 वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राजीव सुरवाडे यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.

Related Articles

Back to top button