---Advertisement---
गुन्हे भुसावळ

धक्कादायक ! भुसावळमध्ये आढळला मृतदेहाचा सांगाडा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । भुसावळ शहरात मृतदेहाचा सांगाडा सापडल्याने शहरात एकाच खळबळ उडाली. हा सांगाडा कुजलेल्या अवस्थेत होता. शहरातील वांजोळा रोडवर रविवारी सकाळी हा सांगाडा आढळला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

हा मृत देह कुजला असल्याने मयत नेमका कोण आहे ? व तो राहणारा कुठला आहे? त्याचा खून झाला आहे की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला आहे. याची माहिती कळू शकलेली नाही. मात्र या मृताचे वय अंदाजे 30 असावे असा अंदाज आहे. याच बरोबर श्वापदांनी मयताच्या शरीराचे लचके तोडल्याचा संशय आहे. केवळ सापळा घटनास्थळी आढल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला वेग दिला आहे.


भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वांजोळा रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे अज्ञाताचा मृतदेह पडून असल्याची माहिती यंत्रेणला मिळताच बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, किशोर महाजन, विजय नेरकर आदींनी धाव घेतली. मयताचे वय अंदाजे 30 असून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला व मयत नेमका कोण व कुठला? या बाबी अस्पष्ट आहे. घटनास्थळी कंबरेपासून वरच्या भागापर्यंत केवळ पोलिसांना सापळा आढळला आहे शिवाय मृताची ओळख पटेल अशी कोणतीही बाब तपासात निष्पन्न झालेली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---