---Advertisement---
गुन्हे भुसावळ

Varangaon : गावठी कट्ट्यासह तरुण पोलिसांच्या तावडीत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैधपणे गावठी कट्ट आढळून येत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असून अशातच आणखी तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाली. अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (वय 30, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kulbhushanpatil firing case arrest

मिळालेल्या माहितीनुसार ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साई मंदिर परिसरात, अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (वय 30, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) हा व्यक्ती अवैध अग्नी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरणगाव पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मंगळवार (दि.18) रोजी घडलेल्या या घटनेत, पोलीसांनी त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे (चार हजार रुपये किमतीचे) जप्त केले.

---Advertisement---

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, पोलीस हेड कॉन्सटेबल यासिन सत्तार पिंजारी, प्रेमचंद वसंत सपकाळे, प्रशांत विनायक ठाकुर, ईश्वर तायडे आणि विजय बावस्कर यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---