⁠ 
रविवार, मे 19, 2024

धक्कादायक : खोटे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । सध्या विनयभंगाचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात वाढले असून बोडवलला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नराधमाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीला खोटे आमिष दाखवून प्लॉटवर नेत तिच्याशी अश्लील कृत्य केले आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू उर्फ नेनू धना सोयसे (मनुर बु.॥, ता.बोदवड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी याने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाकडून आर्थिक लाभ मिळावा म्हणून तेथील प्रकरण करून देतो, असे खोटे आमिष दाखवून रविवारी रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जुना सोनोटी ते बोदवड रोडवरील असलेल्या प्लॉटवर नेत तिच्याशी अश्लील कृत्य केले.

या प्रकरणी पीडितेने बोदवड पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी बाळू उर्फ नेनू धना सोयसे (मनुर बु.॥, ता.बोदवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.