धक्कादायक : जेवण न बनविल्याने पत्नीचा खून

जून 23, 2022 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । जेवण न बनविल्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी काठीने जबर मारहाण करून खून केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही एरंडोल तालुक्यातील जावखेडा येथे उघडीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पती विरुद्द एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 7 jpg webp

बुरकीबाई बाळू बारेला (वय ३० ) मृत विवाहितेचे नाव आहे. मयत या एरंडोल तालुक्यातील जावखेडा येथे वास्तव्यास होत्या. आरोपी पती बाळू बारेला रा.झापडीमाली ता.वरला याने दि. १ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्या पत्नीला जेवण न बनविल्याच्या कारणावरून लाकडी काठ्यांनी मारहाण केली. दरम्यान बुरकीबाई बाळू बारेला यांना डोक्यात जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना लागलीच रुग्नालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणी मयत विवाहितेच्या भाऊने दि. २२ रोजी एरंडोल पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी चोपडा उपविभागीय अधिकारी तृषिकेष रावेल, एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी दि. २२ रोजी ३ ते ५ दरम्यान भेट दिली. त्यानुसार आरोपी पती बाळू बारेला यांच्या भा. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now