⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | धक्कादायक! विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक! विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील नीम गावातील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या आठ वर्षीय चिमुकलीसह विहिरीत आत्हत्या केली. दसर्‍याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तालुक्यातील निम येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी (वय 30) व त्यांची मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय 7) अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. दोन्ही मायलेकींनी मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कळमसरे शिवारातील सबस्टेशन जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारवड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाने करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह