⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

धक्कादायक : लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्यामुळे विवाहितेला उपाशीपोटी ठेवले अन…

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या, आमच्या घराला मुलगा दिला नाही या कारणामुळे सासरच्या लोकांनी एका विवाहितेचा छळ केला. तिला उपाशीपोटी ठेवले. याप्रकरणी रविवारी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अश्विनी सुरेश बोरसे (वय २३, रा. आमडदे, हल्ली रा. पिचर्डे, ता. भडगाव) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. अश्विनी यांचे लग्न सन २०१७ मध्ये आमडदे येथील सुरेश राजू बोरसे यांच्याशी झाले. लग्नानंतर बोरसे दाम्पत्याला दोन मुली झाल्या. मुलगा नसल्याने पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. सतत मुलीच होत आहेत. आमच्या घराला तू मुलगा दिला नाही याचा राग सासरच्यांनी डोक्यात धरला. यातून त्यांनी अश्विनी यांना मारहाण, उपाशी ठेवण्याचे प्रकार सुरू केले. शारीरिक व मानसिक त्रास वाढल्यामुळे अश्विनी यांना सासरी राहणे असह्य झाले होते. त्यामुळे त्या माहेरी निघून आल्या. दरम्यान, आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे त्यांनी अखेर भडगाव पोलिस ठाणे गाठले. अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सुरेश राजू बोरसे, सासरे राजू बोरसे, सासु उषाबाई, दीर प्रशांत बोरसे (सर्व रा. आमडदे) व नणंद मनीषा चेतन बाविस्कर (रा. दिल्ली) या पाच जणांच्या विरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शमिना पठाण तपास करत आहेत.