जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । शहरातील एका परिसरातील महिलेचे व तिच्या पतीचे अश्लील फोटो स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय महिलेचे व तिच्या पतीचे अश्लील फोटो पारोळा तालुक्यातील एका महिलेने तिच्या मोबाईलवरील व्हॉटसअप स्टेटस ठेवत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन होईल अशी भाषा वापरून कॉमेंट केल्यामुळे पीडित महिलेने संशयित आरोपी महिलेच्या विरोधात रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.