धक्कादायक : मुलीच होत असल्याने विवाहितेचा छळ

जुलै 14, 2022 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । भुसावळात एका विवाहितेच मुलीस होत असल्याने छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकणी पीडितेच्या तक्रारी वरून भुसावळ शहर पोलिसांत पतीसह सात जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CRIME 26 jpg webp

संगीता विशाल निसाळ (35, महात्मा फुले नगर, भुसावळ) यांनी पोलिसांत तक्रार दिली. दि. १७ ते २०११ 1 ते 20 फेब्रुवारी 2020 दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने घटस्फोट द्यावा म्हणून छळ केला तसेच घरातून हाकलून दिले.

या प्रकरणी संशयीत आरोपी तथा पती विशाल रमेश निसाळ (35), सासु कमला रमेश निसाळ (60), नणंद अनिता नारायण सपकाळे (40), नणंद बिंदीया शरद सोनवणे (45), नंदोई शरद रामा सोनवणे (50), सोनल विनोद ठाकूर (सर्व रा.शिवनगर सोसायटी, नूतन स्कूलजवळ, भाईपूरा, हडकेश्वर सोसायटी, अहमदाबाद) यांच्याविरोधात शहर पोलिसात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय ईकबाल सैय्यद करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now