⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धक्कादायक : खडकीत महिलेला मारहाण, सोन्याची पोत तोडली

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । काही कारण नसताना एका २६ वर्षीय महिलेला सात जणांनी शिवीगाळ व लोखंडी वस्तूने डोक्यात मारहाण करून दुखापत केली. तसेच सोन्याची पोत तोडून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री सचिन पाटील (वय २६ रा. खडकी ता. चाळीसगाव) या महिलेने पोलिसांत फायद दिली. येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सदर महिला तिच्या घराच्या समोर उभी असताना गल्लीत राहणारे संशयित आरोपी मुरलीधर दौलत मांडोळे, भिमराव दौलत मांडोळे, सतिष दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मिनाबाई भिमराव मांडोळे, अरूणाबाई सतिष मांडोळे आणि छायाबाई मुरलीधर मांडोळे सर्व रा. खडकी ता. चाळीसगाव यांनी लाथाबुक्क्यांनी महिलेला मारहाण केली. तर यातील मुरलीधर मांडोळे याने हातीतील लोखंडी वस्तून महिलेच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. शिवाय महिलेच्या गळ्यांनी सोन्याची पोत तोडून नुकसान केले.

महिलेने जखमी अवस्थेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून सात जणांविरोधात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुरलीधर दौलत मांडोळे, भिमराव दौलत मांडोळे, सतिष दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मिनाबाई भिमराव मांडोळे, अरूणाबाई सतिष मांडोळे आणि छायाबाई मुरलीधर मांडोळे सर्व रा. खडकी ता. चाळीसगाव यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.