---Advertisement---
जामनेर

धक्कादायक : महिलेवर प्राणघातक हल्ला, डुकरांचा की मनुष्याचा?

---Advertisement---

Tondapur News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जामनेर तालुक्यातील वाकोद येथून जवळ असलेल्या तोंडापुर गावात दि. २ सप्टेंबर रोजी एका आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला झाला होता. दरम्यान, पोलिसात दिलेल्या फिर्यादीत डुकरांच्या हल्ल्यात पिडित महिला जखमी झाल्याचं सागण्यात आलं आहे. मात्र, पिडितेच्या चेर्हावर खूप इजा झाल्याने हा हल्ला जंगली प्राण्यांचा की माणसांचा ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय.

jalgaon 2022 09 13T153341.762 jpg webp

तालुक्यातील वाकोद येथून जवळ असलेल्या तोंडापुर गावात दि. २ सप्टेंबर रोजी पिडित महिला व तीची वहिनी हे दोघं शौचलयासाठी बाहेर गेले होते. पिडित महिलाही शौच्चास मोकळ्या जागेत व तीची वहिनी ही बांधलेल्या शौचलयात गेली, काही वेळानंतर पीडित महिलेची वहिनी शौचलयातून बाहेर आली असता, पिडित महिला त्या ठिकाणी दिसली नाही. पाऊस चालु असल्याने पिडित महिला घरी निघून गेली असेल म्हणून तिची वाहिनी देखील घरी निघून आली. परंतु पिडित महिला घरी आली नसल्याने तिने सासु, पती व इतरांन समवेत घेत शौचाच्या ठिकाणी शोधा शोध करत असतांना पिडित महिला गंभीर जखमी अवस्थेत शौचलयाच्या बाजूला असलेल्या गवतात आढळून आली.

---Advertisement---

दरम्यान, पिडितेला गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले, पंरतू त्यांनी पुढे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. तोंडापुर येथून जामनेर व जामनेर येथून जिल्हा सामान्य रूग्णालय व तेथून सुध्दा जखमी पिडितेला डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात पाठवण्यात आले. तेथे उपचार केल्या नंतर या पिडितेला संभाजीनगर येथील घाटी रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि आज रोजी सुद्धा पिडित महिलेवर घाटी येथे उपचार सुरू असून पिडितेच्या प्रकृती मध्ये सुधारणा होतांना दिसत असली तरी पिडितेला अजून बोलता येत नाही.

या प्रकरणी पिडित महिलेच्या नातेवाईकेने पहुर पोलिसांत फिर्याद दिली असून सदर फिर्यादी महिलेच्या सांगण्या वरून पिडित महिलेला डुकरांच्या हल्ल्यात पिडित महिला जखमी झाल्याचं सागण्यात आलं. तसेच पिडित महिलेने डुकरांने हल्ला केलाच फिर्यादी महिलेस सागितंल असल्याचं फिर्यादीत म्हटंल आहे. दरम्यान, शौचलयात असलेल्या महिलेला हल्ला झाला तेव्हा पिडित महिलेचा कुठलाच आवाज आला नसेल का? सायंकाळची वेळ होती तेव्हा इतर कोणत्याच महिला शौच्चासाठी नसतील का?  डुकरांचा हल्ला हा पिडितेच्या चेर्हावर ऐवढ्या इजा करू शकतात काय? असे अनेक प्रश्न तोंडापुर परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. दरम्यान, वैद्यकिय अधिकारी यांच्या मते हा हल्ला जंगली प्राण्यांचा असु शकतो. असा प्राथमिक अंदाज असला तरी रिपोर्ट आल्या शिवाय ठाम सांगु शकत नसल्याचं म्हटंल आहे.

दरम्यान, पहुर पोलीस स्टेशनने पिडितेच्या ज़बाब घेण्यासाठी सदर हॉस्पीटला तीन वेळा पत्र व्यहवार करून दोन वेळेला पिडितेच्या भेटीला जावून आल्याचे कळते आहे. या प्ररकरणी परिसरात मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहेत. सदर महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून गुन्हां दाखल केला असून, पोलीस आपला तपास करत आहेत. वैद्यकिय अधिकारी यांच्या कडून रिपोर्ट व पिडितेचा प्रत्यक्ष ज़बाब घेतल्यानंतरच स्पष्ट बोलता येईल. असे पहूर पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---