धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर जंगलात नेवून अत्याचार
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी दुचाकीवर बसवून त्या मुलीला जंगलात नेण्यात आले. नंतर तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आले. हि घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यात आली असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, सतरा वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या दोन वर्षापासून अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड हा पिडीत मुलीचा पाठलाग करत होता. दरम्यान, २१ जूलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिडीतेला गोड बोलून तिला तिच्या काकांबद्दल सांगायचे आहे व त्याचे मोबाईलमध्ये काय आहे ते दाखवायचे आहे असे सांगितले. आपण थोडे पुढे जावू असे सांगून पिडीतेला दुचाकीवर बसवून पिंप्रीसेकम शिवारातील जंगलात नेले. तिथे तिला मारहाण करून बळजबरी अत्याचार केला.
याप्रकरणी पिडीतेने भुसावळ ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे करीत आहे.