जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : २२ मे २०२१

मे 22, 2021 6:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ४०५ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ८७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ९ जणांचा मृत्‍यू झाला.

corona

जळगाव जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ९५१ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २७ हजार १६७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ८ हजार ३०६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २४७८ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-३१, अमळनेर-२३, चोपडा-३६, पाचोरा-२८, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२२, एरंडोल-२५, जामनेर-४८, रावेर-३१, पारोळा-१७, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-१६, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यात १०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now