मतदान करणाऱ्यांना मिळणार नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट ; कांताई नेत्रालयातर्फे सुविधा

मे 13, 2024 4:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । सध्या लोकसभा निवडणुका सुरु असून यादरम्यान मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. अशातच कांताई नेत्रालयातर्फे देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवस नेत्रतपासणी विनामूल्य केली जाणार आहे.

netra tapasa jpg webp

जळगावातील जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. १३ व १४ मे या कालावधी करिता मर्यादीत आहे. सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पुर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कांताई नेत्रालयातर्फे विनामूल्य नेत्रतपासणीसह ‘आय केअर ऑप्टीकल’ येथे चष्मा खरेदी वर दहा टक्के सवलत ही देण्यात आली. दि. १३ रोजी मतदान केल्यापश्चात अनेक मतदारांनी या संधीचा लाभ घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now