जळगाव जिल्हा

आमदार भोळे यांच्यावर शिवसेनेने केलेले आरोप बिनबुडाचे – नगरसेवक मराठे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । शहराचे आमदार हरविले असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दि.४ रोजी मनपासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनात केलेल्या आरोपांचे भाजप नगसेवक राजेंद्र मराठे यांनी खंडन केले असून ज्यावेळी शिवाजी नगर उड्डाणपुलाची मुदत संपली होती, त्यावेळेचे आमदार कोण होते? शिवाजी नगर उड्डाणपुलाची मुदत सन २००० सालीच संपली त्यानंतर नपा, मनपामध्ये सत्ता कोणाची होती? असा सवाल उपस्थित करून आ. भोळे यांनीच पाठपुरावा केल्यानंतर १०० टक्के निधी मंजूर केला आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन सध्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनीच केले. पुलाचे काम हे मविआ सरकारच्या कारकीर्दीतच सुरु आहे. आजही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटीलच आहे. हे शिवसेनेने लक्षात घ्यावे, तसेच शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे ही मागणी स्वतः आ. भोळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. असे मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे. तसेच आ. भोळे यांनी शिवाजीनगरवासियांच्या सुखदुःखात विविध सार्वजनीक कामांमध्ये आ.भोळे यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे सेनेने बघण्याच्या दृष्टिकोन बदलावा असा सल्लाही दिला आहे.

Related Articles

Back to top button