⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Ahirani Pavari Songs : झिंगी पावरीच्या अभूतपूर्व यशानंतर धुमाकूळ घालतेय ‘जळगाव खान्देशी पावरी’

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । खान्देशचा आणि अहिराणीचा फार संबंध आहे. खान्देशात अनेक भागात आजही अहिराणीच बोलली जाते. खान्देशच्या अहिराणीसोबत खान्देशी पावरी देखील प्रसिद्ध आहे. आदिवासी बांधवांमध्ये लोकप्रिय असलेल्या पावरी संगीताला नव्या दमाने एकबद्ध करीत तीन वर्षांपूर्वी झिंगी पावरी प्रदर्शित झाली होती. देशभरातून झिंगी पावरीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उमेश तायडे यांनी जळगाव खान्देश पावरी सादर केली आहे. अवघ्या तीन आठवड्यात पावरीला युट्युबवर १ लाख १६ हजार व्ह्यूज मिळाले आहे. लग्नसराईचा सीझन सुरु झाला असून लग्नात पावरी नृत्याची वेगळीच क्रेझ असते.

खान्देशातील नागरिकांची अहिराणी हि बोलीभाषा चांगलीच प्रचलित आहे. अहिराणी बोली भाषेचे वाढते महत्व लक्षात घेता अहिराणी गाण्यांची मागणी देखील वाढली आहे. लग्न, हळदी समारंभात आवर्जून अहिराणी गाणे लावण्याचा आग्रह केला जातो. अहिराणी गाण्यांच्या तालावर ठेका धरत वऱ्हाडी मंडळी जोशात नाचताना दिसतात. खान्देशात ज्याप्रमाणे अहिराणी गाणे प्रचलित आहेत तसेच पावरी संगीत देखील प्रसिद्ध आहे. विशेषतः आदिवासी समाजात पावरी नृत्य केले जाते. तसेच शिरपूर, धुळे, नंदुरबार परिसरात देखील पावरी नृत्यासारखे समूहाने एकाच वेळी एक तीन-चार पावली नृत्य केले जाते. झिंगी पावरी भिलाऊ गाण्यात देखील मोडले जाते.

पावरी संगीताची सांगड घातलेले झिंगी पावरी हे गाणे मि.खान्देशी या युट्युब चॅनलवर तीन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आले होते. तीन वर्षात या गाण्याला तब्बल ७७ लाख ३६ हजार व्ह्यूज मिळाले आहे. उमेश तायडे आणि रत्नाकर कोळी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये खान्देशी झिंगी पावरी हे गाणे युट्युबला अपलोड केले होते. खान्देशी झिंगी पावरी नंतर त्यांनी जळगाव खान्देशी पावरी तयार केले असून तीन आठवड्यापूर्वी युट्युबला रिलीज करण्यात आले आहे. व्हिडीओला १ लाख ७७ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. झिंगी पावरी खान्देशात चांगलीच लोकप्रिय असून नवीन पावरीला देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे.