⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावातही बरसणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । उकाड्याने हैराण झालेल्या आणि मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. यातच राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावातही ९ जूनपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी. घामांच्या धारांनी वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. यातच मान्सून आता राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून आजपासून पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारांचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अल्रर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावातही कोसळणार सरी
दरम्यान मान्सूनपूर्व हालचाली वाढल्यामुळे पावसाचे आगमन झाले आहे. जळगावात आज ६ जून ते ९ जून या चार दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी सायंकाळी ते मध्यरात्री पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर बुधवारी सकाळी काही वेळ ढगाळ वातावरण झाले होते. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला होता. १५ जूननंतर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली