जळगाव एसीबीच्या उपअधीक्षकपदी शशिकांत पाटील

जुलै 26, 2021 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच्या पोलीस उप अधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभार स्विकारला.

Untitled design 6 jpg webp

जळगाव एसीबी युनीटचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्याकडून हा पदभार पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांनी दि.२३ जुलै रोजी घेतला आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने अथवा खासगी व्यक्तीने शासकीय काम करुन देण्याकामी लाचेची मागणी केल्यास एसीबी जळगाव शाखेशी ०२५७-२२३५४७७ यावर किंवा पोलीस उपअधीक्षक ८७६६४१२५२९ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now