‘बिझनेस हेल्थ टेस्ट’ ही काय भानगड आहे ? उद्योगांच्या डिजिटल वाढीसाठी जळगावमध्ये विशेष सेमिनार

फेब्रुवारी 4, 2026 3:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | माणसाला जशी आरोग्याची तपासणी गरजेची असते, तशीच व्यवसायालाही ‘हेल्थ टेस्ट’ची गरज असते. आपला व्यवसाय नेमका कोणत्या दिशेने जात आहे? त्यात कुठे त्रुटी आहेत? आणि वाढीच्या संधी कुठे दडल्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जळगावमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.

Biz Seminar

सरकारी योजना आणि पाठबळ अनेकदा भांडवलाअभावी किंवा योग्य माहितीअभावी चांगले व्यवसाय मागे पडतात. सरकारकडून एमएसएमई (MSME) क्षेत्रासाठी अनेक अनुदान योजना आणि विनातारण कर्ज उपलब्ध असते, परंतु त्याची तांत्रिक माहिती सामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचत नाही. या सेमिनारच्या माध्यमातून ‘ए.पी. कन्सल्टंट्स’ या योजनांचा मार्ग सुलभ करून देणार आहेत.

गुणवत्तेची नवी ओळख जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी ‘झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट’ (ZED) प्रमाणपत्र आता अनिवार्य होत आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होत नाही, तर उत्पादनाचा दर्जाही सुधारतो. या प्रमाणपत्राचे फायदे आणि ते मिळवण्याची प्रक्रिया यावर या सेमिनारमध्ये विशेष मार्गदर्शन सत्र होईल.

का उपस्थित राहावे?
1.⁠ ⁠आपला व्याप वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या फंडिंगच्या संधी समजून घेणे.
2.⁠ ⁠आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय ऑनलाइन कसा नेवा, याची माहिती.
3.⁠ ⁠जिल्ह्यातील इतर उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी.
4.⁠ ⁠जळगावच्या औद्योगिक विकासाला नवी चालना देणारा हा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरेल.

या सेमिनारसाठी प्रवेश शुल्क असून, त्यामध्ये चहा, दुपारचे जेवण आणि हाय-टीचा समावेश आहे. जळगावमधील जास्तीत जास्त उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी 8956159407 किंवा 9156044824 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now