जळगाव कृषी बाजार समितीसमोर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; जीवितहानी टळली

जानेवारी 30, 2026 1:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२६ । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली रस्त्यावर उलटली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी घडली असून या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

troli

मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा माल खाली करून ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 8416) भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटमधून बाहेर पडत होते. मार्केटमधून बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हे ट्रॅक्टर अचानक रस्त्यावरच पलटी झाले. सकाळी १० ची वेळ असल्याने बाजार समितीच्या परिसरात मोठी गर्दी होती. ट्रॅक्टर पलटी झाल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच धावपळ उडाली.

या अपघातात चालकाला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही, हा मोठा दिलासा ठरला. मात्र, महामार्गाच्या मध्यभागी ट्रॅक्टर आडवे झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर नागरीकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now