जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु होते. मात्र सलग दुसऱ्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आलीय. यावेळी सेन्सेक्स १४७ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-५० देखील ७३ अंकांच्या वाढीसह बंद झाला.

आंतरराष्ट्रीय आघाडीवर एक मोठी बातमी अशी आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबाबत महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. या मुद्द्यावरील पुढील घडामोडी देखील बाजारासाठी महत्त्वपूर्ण असू शकतात.
आज बुधवारी सेन्सेक्स १४७.७९ अंकांनी किंवा ०.२० टक्क्यांनी वाढून ७५,४४९.०५ वर बंद झाला आणि निफ्टी ७३.३० अंकांनी किंवा ०.३२ टक्क्यांनी वाढून २२,९०७.६० वर बंद झाला.
कोणते शेअर्स तेजीत?
आज तेजी असणाऱ्या शेअर्समध्ये ICICIBANK, AXISBANK, ZOMATO, M&M आणि HINDUNILVR या कंपन्यांचा समावेश आहे. तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये TCS, INFY, HCLTECH, BAJFINANCE आणि BAJAJFINSV या कंपन्यांचा समावेश आहे.