या तारखेला शरद पवार येणार जळगाव जिल्ह्यात !

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ ।  माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. याच बरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबिराचे आयोजन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित केले आहे. याच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटन शरद पवार करणा्र आहेत.

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील अनेक नेते अनेक विभागांचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या शिबिराला हजर राहणार आहेत. शिबिराच्या समारोप कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार ह्यांची प्रमुख उपस्थिती असेल.

अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे १६ जून रोजी येत आहेत. दिवसभर शिबिरार्थींसाठी विविध वक्त्यांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now