⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत शानबाग विद्यालय सावखेडा यांचे वर्चस्व

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्टिक व पोलीस जलतरण तलाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेला जळगाव जिल्ह्यातील 70 जलतरणपटू यांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन संदीप गावित पोलीस उपाधीक्षक गृह जळगाव यांच्या शुभहस्ते झाले.

या स्पर्धेत विजेतेपद शानबाग विद्यालय सावखेडा यांनी पटकाविले उपविजेतापद काशिनाथ पलोड तर तृतीय रायसोनी हायस्कूल जळगाव हे राहिले. या स्पर्धेत वॉटर पोलो चा रंगतदार सामना देखील संपन्न झाला स्पर्धेत तीन हायस्कूल यांनी आपला सहभाग नोंदवला होता यापैकी शानबाग विद्यालय सावखेडा हे विजेते ठरले तर उपविजेता संघ बियाणी हायस्कूल भुसावळ राहिला विजेता खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस जळगाव चे आमीर शेख यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण ऑडिटर गजानन वखरे यांच्या शुभहस्ते झाले यावेळेस असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र ओक, सचिव फारुक शेख, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा गोल्हाने हे उपस्थित होते.

स्पर्धा आयोजनासाठी पंच म्हणून कमलेश नगरकर सुरज दायमा, हिदायत खाटीक, राहुल सूर्यवंशी भूषण तायडे, राजेश नेवे, आरिफ पिंजारी, धनश्री जाधव, आयान शेख, राजू जाधव, ईश्वर खंदार यांनी परिश्रम घेतले.