सात वर्षीय बालिकेचे केले अपहरण

एप्रिल 26, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच उघड झाली. याप्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

crime 54 jpg webp

यासंदर्भात राकेश भाईदास बारेला (वय २०, रा. पिंप्री खु.,ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ एप्रिल रोजी पिंप्री खुर्द येथून त्यांची बहीण मुंगळी भाईदास बारेला (वय ७) हिचे अज्ञात इसमाने अपहरण केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी शोधासाठी मध्यप्रदेशसह विविध भागात पथके रवाना केली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now