जळगाव शहर
संजय गांधी निराधार योजनेसाठी समिती स्थापन करा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यातील रेशन दुकानांसंदर्भात असलेल्या अडचणी, पॉस मशिन्समुळे येणाऱ्या अडचणी व रेशन वेळेवर पुरवठा होणे संदर्भात तसेच नवीन राज्य सरकारने शासकीय समित्या रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.पाटील यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बंगालसिंगजी चीतोडिया, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, व्हीजे एन.टी.सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चीतोडीया, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशील कुमार शिंदे, दिपक पाटील, जितेंद्र बाग्रे, राहुल टोके, नईम खाटीक व मान्यवर उपस्थित होते.