⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

आमदार भोळेंनी बनवलेल्या निधीतील ‘त्या’ १४ लाखांच्या गटारी गेल्या कुठे?

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । आमदार राजुमामा भोळे यांनी बनवलेल्या त्या १४ लाखांच्या गटारी गेल्या कुठे? असा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे ज्या १४ लाखांच्या गटारी मामांनी आमदार निधीतून बनवल्या होत्या त्या फक्त कागदावरच बनल्या असून प्रत्यक्षात मात्र काहीही नाही.

जळगाव लाईव्ह न्यूजतर्फे जळगाव शहराचा रियालिटी चेक सुरु आहे. अश्या वेळेस शहरातील विविध भागातील नागरिक आपल्या तक्रारी जळगाव लाईव्हच्या माध्यमातून महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचवत आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधील मुकुंद नगरमधील नागरिकांनी एक अजब तक्रार जळगाव लाईव्हसमोर मांडली.  मुकुंद नगर परिसरात राजू मामा यांनी १४ लाख ५० हजार रुपयांच्या गटारी बनवलेल्या होत्या. मात्र त्या केवळ कागदावर असून प्रत्यक्षात एकही गटारीचे बांधकाम नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

bhole

२०१९ च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीत आमदार भोळे यांच्या पारदर्शक आमदार, पारदर्शक सरकार या जाहीर नाम्यात जळगाव शहरासाठी केलेल्या १० कोटी रुपयांच्या कामात मुकुंद नगर मधील गटारींच्या कामाचाही उल्लेख आहे. मात्र आमदार भोळे यांनी या गटारी १४ लाख ५० हजार इतक्या निधीतून बनवल्या आहेत असे हि सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी एकही गटार नसलेचे दिसून येत आहे.

आमदार भोळेंकडून टोलवाटोलव

आमदार राजूमामा भोळे यांना या विषयी खुलासा मागण्यासाठी जळगाव लाईव्हने संपर्क केला असता सुरुवातीला माहिती घेतो असे सांगितले. मात्र गेल्या १ आठवड्यात राजुमामांना संपर्क केल्यानंतर देखील आ.भोळे यांनी समर्पक खुलासा केला नसून केवळ टोलवाटोलव केली आहे.