गंभीर प्रकार : बनावट स्वाक्षरीने शिक्षक भरती, १४ जणांवर गुन्हा

फेब्रुवारी 17, 2022 5:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । बनावट स्वाक्षरी करून सहा शिक्षकांची भरती केल्याचा गंभीर प्रकार अडावद येथे उघडीस आला आहे. या प्रकरणी येथील सार्वजनिक विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक व विद्यमान मुख्यध्यापकांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

crime 6 jpg webp

सविस्तर असे की, अडावद परिसर शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब चिंतामण देशमुख यांनी प्रोसिडींग बुकमध्ये अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून, धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात फेरफार अर्ज दाखल केले. रतिलाल सुका राजकुळे यांना अध्यक्ष भासवून शिक्षक भरती प्रस्तावांवर अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सहा शिक्षकांची भरती केली. बनावट दस्तऐवजांच्या आधारावर शिक्षक मान्यता घेऊन शिक्षकांचे वेतनही काढले. हा प्रकार संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देशमुख यांना लक्षात आला. त्यामुळे देशमुख यांनी अडावद पोलिस ठाण्यात बाळासाहेब देशमुख, निवृत्त मुख्यध्यापिका मिना देशमुख, जिजाबराव देशमुख, रतिलाल राजकुळे, शांताराम कोळी, प्रमोद देशमुख, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज देशमुख, नंदकुमार देशमुख, विजय कोळी, मुख्याध्यापक अशोक कदम, निवृत्त मुख्यध्यापक सुभाष पाटील व शांताराम गवळे या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

आरोपींना अटक करू

तक्रारीची सत्यता पडताळली असता वस्तुस्थिती लक्षात आली. लवकरच सर्व आरोपींना अटक करू, असे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now