खळबळजनक : महिलेला नाश्त्यातून दिले गुंगीचे औषध, २ लाखात केली विक्री, उज्जैनला अत्याचार

जून 16, 2022 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२। दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामधून गुंगीचे औषध देत तरुणीला पळवून नेत तिची दोन लाखात लग्नासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने रावेर पोलिसांत तक्रार दिली आहे.

CRIME 26 jpg webp

रावेर तालुक्यातील पाल येथे २५ वर्षीय पीडित वास्तव्यास आहे. तिला दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामधून गुंगीचे औषध देत तरुणीला पळवून नेत तिची दोन लाखात लग्नासाठी विक्री केली. पळवून नेलेल्या तरुणीला जीवे ठार करण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध जाऊन राकेश भगीरथ वर्मा ( वय ३०, रा. घाटपिपल्या ता. झारडा. जि. उज्जैन, मध्यप्रदेश ) याच्याशी लग्न लावले व वर्मा यांनी पीडितेच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक अत्याचार केला. याबाबत पीडितेने रावेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भा, कलम ३६६,३२७, ३४२,३७६, (२) (n) ३२३, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधन सुधारणा कायदा २०१५ कलम २,n,r प्रमाणे दोन अनोळखी महिलासह आठ जणांविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फैजपूर विभाग, कुणाल सोनवणे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now