महाराष्ट्रराजकारण

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली! ‘ही’ आहे तारीख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ४० दिवस उलटल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. त्यानतंर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागून होते. मात्र अशातच मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख समोर आलीय. त्यामुळे यात नाराज आमदारांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलीय. आमदारांमध्येही सौम्य नाराजी आहे. विधिमंडळाचं अधिवेशन पार पडल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं होते. मात्र सरकार होऊन ४० दिवस उलटल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. या विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी (१४ ऑगस्ट) खातेवाटपही जाहीर झाले. यादरम्यान मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने तसेच खातेवाटपावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करुन नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. अशातच १५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी तसेच नाराजीबद्दल आमदार बच्चू कडू यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरु राहील. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. माझ्या कामानिमित्त बाहेर असल्याने येऊ शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी नाराज होणार नाही, असे ते म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये न्याय, अपंग कल्याण या खात्याचं मंत्रिपद तसेच अमरावतीचं पालकमंत्रिपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान मिळालं नव्हतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे, ते शब्द पाळतील असं बच्चू कडू म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button