⁠ 
शनिवार, मे 4, 2024

गायींच्या कानास टोचलेल्या टॅग(बिल्ल्यां)मुळे लागला चोरीस गेलेल्या गायींच्या मालकाचा शोध

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । २६                   जून २०२१ रोजी अवैधरित्या जनावरे नेत असलेल्या पिकअप वाहनातुन ३गायी व १वासरू आढळुन आले असता त्यांची गो-शाळेत रवानगी करण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी डॉ.अशोक महाजन यांनी केली.

या दरम्यान दोन्ही गायींच्या कानात बिल्ले आढळुन आल्याने सदर बिल्ले हे पशुसंवर्धन विभाग एरंडोल यांनी ‘इनाफ प्रणाली,अंतर्गत केलेल्या लसीकरण मोहीमेदरम्यान टोचल्याचे लक्षात आले, नोंदी पाहील्या असता सदरील गुरांच्या मालकांची नावे आढळुन आली. 

संदीप भगतराव मराठे रा.टोळी हे गुरांचे मालक असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी योग्य ती कार्यवाही करून संबंधित जनावरे मालकाच्या स्वाधिन केली.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक महाजन, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलिस कर्मचारी विलास पाटील, सुनिल लोहार यांनी गोधन मूळमालकाला परत करण्यासाठी परीश्रम घेतले. गायींचे मालक मराठे यांनी पशुवैद्यकीय यंञणा व पोलिस प्रशासन यांना धन्यवाद दिले.

दरम्यान पशुपालकांनी आपल्या जनावरांना कानात बिल्ले टोचुन लसीकरण करून घ्यावे त्यामुळे गुरांची ओळख पटविण्याकामी फायदेशिर ठरते असे मत दोन्ही यंञणांनी व्यक्त केली आहे.