⁠ 
रविवार, मे 5, 2024

एरंडोलात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । एरंडोल तालुक्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित, स्थलांतरित मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २३ जून २०२२ च्या शासन निर्णय नुसार दि. ४ जुलै रोजी तालुकास्तरावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत दि. ५ जुलै ते २० जुलै पर्यंत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण करिता व त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी १२८ प्रगनक व १७ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या कालावधीत घरोघरी जाऊन नोंदी घेऊन विटभट्टया, शेतमळे, दगड खाणी, वाडा वस्ती, हाँटेल मध्ये काम करणारे येथे जाऊन पालकांच्या मुलांना शाळेत दाखल करुन घेणे व मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मिशन झिरो drop out राबविण्यात येणार आहे. या बैठकीत तहसीलदार सुचिता चव्हाण अध्यक्ष स्थानी होत्या. त्यांनी मार्गदर्शन करतांना नागरिक, पालक, स्वंयसेवी संस्था, युवक यांना मिशन मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

या बैठकीत गटविकास अधिकारी डी. ए. जाधव , वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख , प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील , स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी प्रवीण महाजन यांची उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी व्ही. एच. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र महाजन यांनी आभार मानले.