⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | वारकऱ्यांसाठी गुडन्यूज ! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर, असा आहे पालखीचा प्रवास?

वारकऱ्यांसाठी गुडन्यूज ! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर, असा आहे पालखीचा प्रवास?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । कोरोना निर्बंधामुळे वारकऱ्यांच्या मनासारखी वारी झाली नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचं सावट कमी झाल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर राज्य सरकारकडून पायी वारीला परवानगी मिळालेली आहे. यादरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक नुकतचं जाहीर करण्यात आलं आहे.

20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) पालखीचं पंढरपूरकडे (Pandharpur) होणार प्रस्थान होणार आहे. 9 जूलैला वाखरी तळावर पालखी पोहोचणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे यंदा वारी सोहळा उत्साहात होणार आहे.

palki
02
03

असा आहे पालखीचा प्रवास?
देहूतील मुख्य मंदिरातून पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल. 21 जून आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 आणि 23 जूनला निवडुंगा विठ्ठल मंदीरात मुक्काम असेल, 24 जूनला लोणी काळभोर येथे मुक्काम असेल, 24 जून यवत, 25 जून वरवंड, 27 जून उंडवडी गवळ्याची, 28 जून बारामती, 29 जून सणसर, 30 जूनला आंथर्णी, 1 जुलै निमगाव केतकी, 2 जुलै इंदापूर, 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज, 6 जुलै बोरगाव, 7 जुलै पिराची कुरोली, 8 जुलै वाखरी तळ येथे मुक्काम असतील.

9 जुलैला पालखी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 10 जुलैला पंढरपूरला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर 10 जुलैपर्यंत याच ठिकाणी मुक्कामी असेल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.