SBI चा ग्राहकांना मोठा झटका, बँकेने बदललेला हा नियम वाचून फुटेल घाम..

ऑक्टोबर 17, 2022 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । तुम्हीही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमीचा आहे. ती म्हणजे आता SBI कडून कर्ज घेणे महाग होणार असून नवीन आणि जुन्या ग्राहकांचा EMI देखील वाढणार आहे. खरतर SBI आणि फेडरल बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने विविध मुदतीच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 25 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. याआधी जून आणि जुलै आणि ऑगस्टमध्येही एसबीआयने एमसीएलआरमध्ये सातत्याने वाढ केली होती. हे दर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. दोन्ही बँकांचे नवीन दर जाणून घेऊया.

sbi jpg webp

SBI चा MCLR 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल
एक दिवस – 7.60%
एक महिना – 7.60%
3 महिने- 7.60%
6 महिने- 7.90%
एक वर्ष- 7.95%
2 वर्षे- 8.15%
३ वर्षे- ८.२५%

फेडरल बँकेचा MCLR 16 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल
एक दिवस – 8.45%
एक महिना – 8.50%
3 महिने- 8.55%
6 महिने- 8.65%
एक वर्ष – 8.70%

एफडीचे व्याजदर वाढले
याशिवाय फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात (FD व्याजदर) देखील बँकेने अलीकडेच वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केलेल्या माहितीनुसार, SBI ने सर्व मुदतीसाठी त्यांच्या FD च्या व्याजदरात 20 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील. बँकेच्या वेबसाइटनुसार, FD वर वाढलेले व्याजदर देखील 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू आहेत. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर रिटेल एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, FD व्याजदरात 10 बेसिस पॉइंट (bps) पासून 20 bps पर्यंत वाढ केली आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती
अलीकडील पतधोरण आढाव्यात, RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्के केला, त्यानंतर बँकांनी MCLR वाढवण्यास सुरुवात केली. आम्ही तुम्हाला सांगतो की रेपो दर 3 वर्षांच्या उच्चांकावर आहे. मे महिन्यातील 0.40 टक्क्यांच्या वाढीनंतर या वर्षी आतापर्यंत आरबीआयने जून आणि ऑगस्टमध्ये 0.50-0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे, म्हणजेच आरबीआयने या वर्षी आतापर्यंत एकूण 1.90 टक्क्यांनी रेपो रेट वाढवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now