जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरी मिळविण्यातही प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने तब्बल १३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलीय. पदवी पास असलेल्या उमेदवारांना बँकेत नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
आजपासून म्हणजेच १७ डिसेंबरपासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदासाठी ही भरती होणार आहे. एकूण १३७३५ रिक्त पदे भरली जाणार आहे. यामध्ये अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५८७० पदे आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांसाठी ३००१ पदे रिक्त आहेत. SC उमेदवारांसाठी २११८ पदांसाठी नोकऱ्या आहेत. एसटीसाठी १३८५ पदांवर भरती होणार आहे. १३६१ पदे EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. ही भरती वेगवेगळ्या राज्यांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार ज्या राज्याचा असेल त्याला त्या राज्याची भाषा येणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जावे लागेल
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क :
या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवरांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
किती पगार मिळेल? : पात्र उमेदवारांना दरमहा 17900/- रुपये ते 47920/- रुपये पगार मिळेल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा