⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | बँकेत नोकरीची संधी.. SBI मध्ये पदवीधरांसाठी 1422 जागांसाठी बंपर भरती

बँकेत नोकरीची संधी.. SBI मध्ये पदवीधरांसाठी 1422 जागांसाठी बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SBI CBO Recruitment 2022 : बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे. या पदांसाठी नोंदणीची प्रक्रिया आज 18 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे. पदांनुसार इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात sbi.co.in किंवा sbi.co.in/careers वर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख  07 नोव्हेंबर 2022 आहे.

पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
वयो मर्यादा :
21 ते 30 वर्षे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 30 सप्टेंबर 2001 नंतर झालेला नसावा आणि 1 ऑक्टोबर 1992 पूर्वी झालेला नसावा. SC आणि ST प्रवर्गाला उच्च वयोमर्यादेत पाच वर्षे आणि OBC साठी तीन वर्षांची सूट दिली जाईल.
इतका पगार मिळेल :
मूळ वेतन रु.36,000/- पासून सुरू होईल. ( 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 ), DA, HRA, CCA, वैद्यकीय आणि इतर भत्ते देखील.

महत्वाच्या तारखा :
नोंदणी सुरू होण्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2022
नोंदणीची अंतिम तारीख – 7 नोव्हेंबर 2022
परीक्षेचे प्रवेशपत्र – नोव्हेंबर/डिसेंबर 2022
परीक्षेची तारीख – ४ डिसेंबर (तात्पुरती)

निवड :
ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत.

परीक्षेचा नमुना
ऑनलाइन लेखी परीक्षेत दोन विभाग असतील. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक. 2 तासांच्या वस्तुनिष्ठ पेपरमध्ये 120 गुणांचे 120 प्रश्न (इंग्रजी, बँकिंग, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड) विचारले जातील. दुसरीकडे, इंग्रजी लेखनाची चाचणी (पत्र लेखन आणि निबंध) वर्णनात्मक मध्ये घेतली जाईल. हा विभाग ५० गुणांचा असेल ज्यासाठी ३० मिनिटे दिली जातील. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.