जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ओक्टोबर २०२२ । सणासुदीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. तुमचे खाते देखील SBI मध्ये असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर (FD व्याजदर) पुन्हा एकदा वाढवले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केलेल्या माहितीनुसार, SBI ने सर्व मुदतीसाठी त्यांच्या FD च्या व्याजदरात 20 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील.

नवीन दर आज म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून लागू
बँकेच्या वेबसाइटनुसार, FD वर वाढलेले व्याजदर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू आहेत. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर रिटेल एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, FD व्याजदरात 10 बेसिस पॉइंट (bps) पासून 20 bps पर्यंत वाढ केली आहे.

जाणून घ्या SBI FD वर तुम्हाला किती परतावा मिळेल?
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या FD वर आता 3 टक्के व्याजदर मिळेल.
46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता 4 टक्के व्याजदर मिळेल.
180 दिवस ते 210 दिवसांदरम्यान रिटेल एफडीवर 4.65 टक्के व्याजदर असेल.
211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी ठेवींवर 4.70 टक्के व्याजदर मिळेल.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या SBI FD वर 5.60 टक्के व्याजदर मिळेल.
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.65 टक्के व्याजदर मिळेल.
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.80 टक्के व्याजदर मिळेल.
आता 5 वर्ष ते 10 वर्षांच्या FD वर 5.85 टक्के व्याजदर असेल.












