जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील भिल्ल समाज वस्तीत आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते आमदार निधीतून सभामंडपाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अंदाजित १० लक्ष रुपयांच्या कामाचे सभागृह या निधीतून बांधले जाणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी यावेळी संगितले.यावेळी जि.प.सदस्या जयश्री पाटील, संजय गांधी समिती सदस्य एल.टी.पाटील,पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, माजी नगरसेवक विनोद कदम,दीपक पाटील आदी उपस्थित होते.
वस्तीतील ग्रामस्थांनी होत असलेल्या विकासकामांचे समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच हेमलता कदम, उपसरपंच लखन कदम, सदस्य रविंद्र कदम, संजय नाईक, अनिल नेरकर, लिलाबाई कदम, निकिता कदम प्रतिभा सोनवणे, शोभा अहिरे पंचायतीच्या वतीने उपस्थित होते तर गावातील शाम कदम,तुळशीराम नाईक, दिनेश कदम, कपिल सोनवणे, भुपेश सोनवणे,विश्वास नाईक,सोमा वैदू,गुलाब नाईक,लहू नाईक,रमेश नाईक,सुरेश नाईक, दादा नाईक, अशोक, दिपक, विशाल, तेजस, सोनु गिरधन, विमलबाई, कमलाबाई, भिकुबाई, लताबाई, इंदूबाई व नाईक परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.